Saam Tv
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात पाण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे हालचाल केल्यावर अन्न वर येऊ शकते.
जेवणानंतर पाणी प्यायल्याने काही लोकांची छाती फुगू शकते . त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
लगेच पाणी प्यायल्याने अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे पोटात दुखणे, ढेकर येणे यांसारखे त्रास होऊ शकतात.
जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्याने आम्लाची तीव्रता मंदावते. पोट फुगणे, गॅस होणे यांसारख्या समस्या वाढतात.
पचन बिघडल्यामुळे रक्तातील इन्सुलिन आणि साखरेच्या पातळीवर होऊन चरबी वाढते.
जेवणानंतर किमान ४५ मिनिटे ते १ तास झाल्यावर पाणी प्यावे.खूप तहान लागल्यास एक - दोन घोट तोंड ओले करण्यापुरता पाणी प्यावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.