Saam Tv
लिंबाच्या रसात मध मिसळून कोपरावर लावा. काही वेळाने धुवून टाका. लिंबामुळे त्वचा उजळेल आणि मधामुळे मऊ होईल.
घट्ट दही आणि ओट्स यांचे मिश्रण कोपरावर लावून 10 मिनिटे मसाज करा. दह्यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.
नारळाच्या तेलाचा वापर हा काळेपणा घालवण्यासाठी केला जातो. नारळाच्या तेलाने कोपरावर मसाज केल्यास कोरडेपणा गायब होईल याशिवाय काळेपणा कमी होईल.
ताजे अॅलोवेरा जेल कोपरावर लावा. 20 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. अॅलोवेरा लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.
बटाटा नैसर्गिक ब्लींचिंगचे काम करतो. बटाट्याचा रस किंवा बटाट्याचे काप कोपराला चोळल्याने त्वचेचा काळेपणा कमी होण्यास मदत होते.
नारळाचे तेल आणि साखर हे उत्तम स्क्रब आहे. हा स्क्रब कोपराला चोळल्याने काही दिवसातच काळेपणा कमी होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.