Saam Tv
सकाळी उठल्यावर थंड पाण्याने आणि हलक्या हाताने धुवा. यामुळे चेहऱ्याला तात्पुरते फ्रेश वाटते. सूज कमी दिसण्यास मदत होते.
मऊ कपड्यात बर्फ गुंडाळून काही मिनिटे सूजलेल्या भागावर ठेवा. यामुळे त्वचा घट्ट होईल.
शरीराला पुरेसे पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. दिवसभर थोड्या वेळाने पाणी पित राहा.
जास्त मीठ खाल्ल्याने भरपूर प्रमाणात शरीरात पाणी साचते.त्यामुळे चेहरा फुगतो. चिप्स , स्नॅक्स यांसारख्या अतिखारट पदार्थांचे प्रमाण कमी करा.
झोपताना डोके शरीरापेक्षा हलकेसे उंच राहिल अशी उशी घ्या . यामुळे चेहऱ्याभोवती द्रव साचत नाही परिणामी चेहरा सूजत नाही.
रात्रीची अपुरी झोप किंवा थकव्यामुळे डोळ्यांभोवती सूज येते. चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी नियमित गाढ झोप महत्त्वाची असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.