Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: लग्‍न झाले, नवरीचा गृहप्रवेशही झाला; दुसऱ्या दिवशी घरात घडला धक्‍कादायक प्रकार

लग्‍न झाले, नवरीचा गृहप्रवेशही झाला; दुसऱ्या दिवशी घरात घडला धक्‍कादायक प्रकार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : थाटामाटात लग्‍न सोहळा आटोपल्‍यानंतर घरातून नवरदेवासह त्याची आई व बहिणीचे दागिने चोरीला गेले. एकूण तीन लाख रुपये किंमतीचे दागिने लांबविल्याची घटना जळगावातील (Jalgaon) आदर्शनगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

जळगाव शहरातील आदर्श नगरातील श्रीश्री लॉन्स येथे पुनित वासुदेव मोतीरामाणी हे वास्तव्यास असून ते होजीअरी कपड्यांचे विक्रेता आहे. ७ फेब्रुवारीला त्यांचे लग्न होते. लग्‍न (Marriage) आटोपल्‍यानंतर ८ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी रिसॉर्ट येथील रुममध्ये त्यांची आई कविता मोतीरामाणी यांनी त्यांचा सामान एका बॅगमध्ये भरला. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच नवरदेव आणि त्याची बहिणीजवळील सर्व दागिने त्यांनी एका प्लॅस्टीकचा लॉक असलेल्या कॅरीबॅगमध्ये ठेवले.

हॅण्डपर्समधून लांबविले दागिने

दागिने ठेवलेल कॅरीबॅग कविता मोतीरामाणी यांनी हॅण्डपर्समध्ये ठेवली. संपुर्ण सामान एका रुममध्ये ठेवून ते जेवणासाठी निघून गेले. पुनित मोतीरामाणी यांच्या पत्नीचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी आराम केला. सायंकाळी त्यांनी दागिने ठेवलेली पर्स उघडली असता, त्यांना त्यामध्ये ठेवलेली प्लॅस्टिकचा लॉक असलेली कॅरीबॅग व दागिने दिसून आले नाही. त्यांनी लग्नाठिकाणाहून आणलेल्या संपुर्ण सामानात दागिन्यांचा शोध घेतला मात्र तरी देखील त्यांना मिळून आले नाही. रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहे.

चोरीला गेलेला मुद्देमाल

चोरट्यांनी १२ हजारांची ६ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम, १८ हजारांची ९ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम, ८ हजारांची ४ ग्रॅम वजनाची अंगठी ७० हजारांचा ३८ ग्रॅम वजनाचा आर्टिफिशिअल डायमंड असलेला नेकलेस, ९५ हजारांचा सोन्याचा ५२ ग्रॅमचा नेकलेस, ५२ हजारांचे सोन्याचे २६ ग्रॅमचे मंगळसूत्र, १६ हजारांचे ८ ग्रॅम वजनाची चैन व २० हजारांचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण ३ लाख ७ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT