Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: प्रियकराचा नादात विवाहितेचे घरातच धक्‍कादायक कृत्‍य; चॅटिंगवरून झाला उलगडा

प्रियकराचा नादात विवाहितेचे घरातच धक्‍कादायक कृत्‍य; चॅटिंगवरून झाला उलगडा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील गणपतीनगरातील कापड व्यापाऱ्याच्या सुनेने १० लाखांची रोकड आणि सासूबाईच्या दागिन्यांसह स्वतःचे दागिने, असा ऐवज घेऊन धूम ठोकली. याबाबत पतीने दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर (Police) पोलिसांत पत्नी, तिचा कथित प्रियकर, शालक व सासू-सासरे (Jalgaon News) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Live Marathi News)

जळगाव शहरातील कापड व्यापारी मनोहर नाथानी यांचा मुलगा रोहीत आणि इंदूर येथील मोहनलाल मेहरणी यांची मुलगी विन्नी हिच्यासोबत २९ जानेवारी २०१२ ला विवाह (Marriage) झाला. रोहीत आणि विन्नी यांना आठ वर्षांचा मुलगा आहे. काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण झाले. तत्पूर्वी पत्नी विन्नी कधी भावाला तर कधी आई-वडिलांना पैसे देण्यास भाग पाडत होती. रोहीत याचा शालक सागर मेहरानी याने घेतलेले दोन लाख परत देण्यावरून वाद झाला. तेव्हापासून पती-पत्नीचा वाद वाढतच गेला.

मावस भावाच्या लग्नाला जाण्याचा केला बहाणा

गणपतीनगरमधील पान दुकानावर रोहित नाथानी यांना तुषार उदासी भेटला. त्याने रोहितच्या पत्नीसोबतचे छायाचित्र दाखवून पत्नीला फारकत देण्यासाठी त्याने (Crime News) धमकावले. नंतर काही दिवसांनी रोहितची पत्नी विन्नी हिने इंदूर येथे मावस भावाच्या लग्नाला जाण्याचा बहाणा करून घरातील एकत्र ठेवलेल्या दागिन्यातील स्वतःचे व सासूचे दागिने, दहा लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी रोहित नाथाणी यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात पत्नी विन्नी रोहित नाथाणी, तुषार उदासी, सासरे मनोहर मेहरानी, सासू भावना, शालक सागर यांच्याविरुद्ध चोरी, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.

मोबाईल चॅटिंगने उलगडा

विन्नी हिला दिल्लीत नोकरी लागल्याचे खोटे अपाईंटमेंट लेटर दाखवून ती माहेरी व तेथून प्रियकरासोबत दुबईला जाऊन आली होती. विन्नी नाथानी हिला घेण्यासाठी रोहित इंदूरला गेला होता. सोबत जळगावला परतत असताना त्याच्या हातात पत्नीचा मोबाईल लागला. त्यातील चॅटिंगवरून पत्नीचे तुषार उदासी याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची खात्री झाली. या दोघांच्या चॅटिंगसह मोबाईल संभाषणाच्या क्लीप रोहित याने संकलित केल्या. त्या पोलिसांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

SCROLL FOR NEXT