Chalisgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Crime News: चाळीसगाव तालुका हादरला; एकाच दिवसात दोन खून

चाळीसगाव तालुका हादरला; एकाच दिवसात दोन खून

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील जामडी व चिंचखेडे शिवारात वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून (Crime News) झाला. जामडी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा तर चिंचखेडे येथे एका शेतकऱ्याचा लाकडी दांड्याने हल्ला करून व गळा आवळून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे तालुका हादरला असून, वेगवेगळ्या पोलिस (Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

चिंचखेडे येथे घडलेल्या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील राजेंद्र सुकदेव पाटील (वय ५५) यांचे कुटुंबीय देवळी गावातीलच विमलबाई रामलाल पाटील यांच्या चिंचखेडे शिवारातील शेतजमीन निमबटाईने गेल्या सात वर्षांपासून करीत आहेत. या शेतात कांद्याचे पत्र्याचे शेड असून, तेथे जनावरे बांधलेली असल्याने शेतकरी राजेंद्र पाटील हे नेहमी रात्री झोपायला जात असत. दरम्यान, बुधवारी (ता. ७) रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजेंद्र पाटील हे शेतात झोपण्यासाठी गेले. त्यानंतर गुरुवारी ( ८ मे) सकाळी देवळी गावचे पोलिस पाटील दिलीप पाटील हे राजेंद्र पाटील यांनी घरी जात मुलगा मुकेश यास वडिलांना कुणीतरी डोक्याला मारले असल्‍याचे सांगितले. त्यानंतर मुकेश हा पोलिस पाटलांसमवेत शेतात गेला असता वडील राजेंद्र पाटील हे काहीएक (Jalgaon News) हालचाल केली नसल्याचे दिसून आले. तर पलंगाच्या बाजूला रक्ताने माखलेली लाकडी दांडा आढळून आला.

जामडीत धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला

दुसऱ्या घटनेत जामडी येथील गैबनशहा बाबा दर्गावर गुरुवारी (ता. ८) दुपारी तीनच्या सुमारास फकीर तरुण तरबेज शहा याकूब शहा याचा धारदार शस्त्राने खून झाला. तरबेज हा फतिमा वाचत असताना पाठीमागून युवकाने धारदार शस्त्राने वार करून पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. तरबेज यास चाळीसगाव (Chalisgaon) येथे रुग्णालयात आणत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची भेट घेतली असता घटनेबाबत दुजोरा देत दाखल होत असल्याचे सांगितले. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT