Bangladeshi Woman Rescued from Brothel Racket Saam Tv News
महाराष्ट्र

डांबून ठेवलं अन् देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं; रोज अनोळखी व्यक्तींचं येणं- जाणं; पोलिसांचा छापा अन्...

Police Bust Human Trafficking Racket: प्रोफेसर कॉलनीत बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवून देहविक्री केली जात होती. पोलिसांनी धाड टाकून सुटका केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

उच्चभ्रू परिसरात एका बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवून तिच्याकडून देहविक्री करवून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पोलिसांनी तपास करीत उधळून लावला आहे. हा गोरखधंदा जळगावातील उच्चभ्रू परिसरात सुरू होता. सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली. तसेच मालकीण आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पीडित तरूणी नराधमांच्या कचाट्यात कशी सापडली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

जळगाव शहरातील उच्चभ्रू गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनीत वेश्याव्यवसाय सुरू होता. पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची आज भेट घेऊन, एका बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवत तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करवून घेतली जात असल्याची माहिती दिली होती.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत डॉ. रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सायंकाळी प्रोफेसर कॉलनीतील एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. झडतीदरम्यान एका बांगलादेशी तरुणी सापडली. तिच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र देखील आढळून आले. तरुणीला तत्काळ महिला सुधारगृहात हलवण्यात आले आहे. तर या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महिलेवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याआधीही एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये अशाच स्वरूपाच्या प्रकरणात दुसरी बांगलादेशी तरुणी आढळून आली होती. त्यामुळे जळगावमध्ये वाढत असलेल्या महिला तस्करी आणि देहविक्रीच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. दरम्यान, पीडित बांगलादेशी तरूणीला भारतात कसे आणले? तिचे ओळखपत्र कोणत्या मार्गाने तयार करण्यात आले? तिला या अमानुष व्यवसायात ढकलणारी टोळी कोणती? या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT