Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Online Fraud : शेअर मार्केटच्या बनावट ॲपद्वारे नऊ लाखांत फसवणूक; भुसावळच्या एकजण ताब्यात

Rajesh Sonwane

सावदा (जळगाव) : शेअर मार्केटचे गुंतवणुकीसाठी बनावट अप्लिकेशन बनवून त्याद्वारे भोपाळ येथील एकाची नऊ लाख ३५ हजारांत आनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील तपास सुरु असताना भोपाळ पोलिसांनी संशयितास जळगाव जिल्ह्यातील सावदा येथून ताब्यात घेतले आहे. 

भुसावळ (Bhusawal) येथे वास्तव्यास असलेला संशयित अनिकेत दत्तात्रय बऱ्हाटे याने शेअर मार्केटचे अप्लिकेशन बनविले होते. त्यात भोपाळ येथील एका जणांशी संपर्क करून शेअर मार्केटच्या अँपमध्ये पैसे गुतविण्याचे आमिष दाखविले. चांगला परतावा मिळण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने पैशांची गुंतवणूक केली होती. काही दिवसांनी या ॲप्लिकेशनमध्ये जमा झालेली रक्कम तक्रारदार काढण्यासाठी गेले असता फसवणूक (Online Fraud) झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भोपाल गुन्हे शाखेत फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. 

दरम्यान भोपाल गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे बनावट अकाउंट तयार करणाऱ्या संशयितांचा शोध घेतला असता अनिकेत बऱ्हाटे याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. तपास केला असता अनिकेत हा सावदा शहरात असल्याची माहिती भोपाल गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने सावदा पोलिस ठाणे गाठत संशयित अनिकेत बऱ्हाटे याला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT