Jalgaon firing case  Saam t
महाराष्ट्र

रथोत्सवाला आई-वडिलांना घेऊन गावी आला; घरामागे उभा असताना बंदुकीच्या गोळीनं घेतला वेध, थेट छातीत घुसली!

Jalgaon firing case : रथोत्सवाला आई-वडिलांना घेऊन गावी आलेल्या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही गोळी तरुणाच्या छातीत घुसल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Vishal Gangurde

जळगाव जिल्ह्यातील कढोली गावात रथोत्सवाच्या तोंडावर गोळीबार

३१ वर्षीय तरुणाच्या थेट छातीत गोळी घुसली

जखमी तरुणाला तातडीने जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल

आरोपी परिचित असल्याची शक्यता, पोलिस तपास सुरू

घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण

संजय महाजन, साम टीव्ही

​जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र थांबताना दिसत नाही आहे. सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात आज एका ३१ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

​जखमी तरुण एका खासगी कंपनीत कामाला आहे. पारोळा येथील रथोत्सव असल्याने तो आपल्या आई-वडिलांना घेऊन मूळ गावी (कढोली) जाणार होता. आज तो कढोली गावात घराच्या मागील बाजूस उभा होता. त्यावेळी अचानक गोळी आली आणि ती त्याच्या हाताच्या खांद्याखाली छातीजवळ घुसली. यामुळे मोठा रक्तस्राव झाला. ज्यामुळे त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथे हलवावे लागले.

गोळीबार करणारे आरोपी जखमी तरुणाच्या परिचयाचे असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एरंडोल पोलीस नेमकी घटनास्थळ (कढोली गाव) आणि गोळीबारामागील नेमके कारण काय होते, याचा कसून तपास करत आहेत. रथोत्सवाच्या तोंडावर झालेला हा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत.

खडसेंच्या घरातील चोरीप्रकरणी दोघांना अटक

एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीये. या प्रकरणातील आरोपींनी उल्हासनगरमध्ये चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. त्यानंतर चिरागने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नावाच्या सराफ व्यवसायाकडे दिला. चोरी प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आलीये. मात्र घरफोडी करणारे तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

ही घटना कुठे घडली?

ही घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कढोली गावात घडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT