Jalgaon Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: 'बॉडी मसाजसोबत अनैतिक संबंधासाठी ऑफर', मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री; ४ महिलांची सुटका

Police Bust Massage Parlour Running Trade in Jalgaon: मसाज पार्लरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी कारवाई करत चार महिलांची सुटका केली.

Bhagyashree Kamble

जळागावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करत देहविक्रीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, दोघा परप्रांतीय आरोपींवर पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील नयनतारा ऑक्रिड मॉल येथील एका मसाज पार्लर देहविक्रीचा प्रकार सुरू होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. संबंधिक व्यक्तीने त्याला बॉडीमसाजसोबत इतर अनैतिक सेवांचे आमिष दिले. याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. तसेच छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतलं. छाप्यावेळी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलांची सुटका करून त्यांना स्थानिक संरक्षण गृहात पाठवण्यात आले. तर, पार्लर चालवणाऱ्या दोघा परप्रांतिय आरोपींवर पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंजवण्यात आला आहे.

देहविक्रीवर या अनैतिक व्यवसायावर जळगावचे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सपोनी शितल कुमार नाईक, उपनिरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT