Jalgaon Corona saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Corona: सक्रिय रुग्णसंख्या हजारावर; तिसऱ्या लाटेतील पहिला बळी

सक्रिय रुग्णसंख्या हजारावर; तिसऱ्या लाटेतील पहिला बळी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची तीव्रता रुग्णसंख्येच्या दृष्टीने वाढत चालली आहे. एकाच दिवसात २८५ नवे बाधित आढळल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या हजारावर पोचली, तर एका ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. (jalgaon corona update Active patient population in the thousands The first victim in the third wave)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून रुग्णसंख्या वाढू लागली. डिसेंबरअखेर पाच-सात सक्रिय रुग्ण (Jalgaon Corona) असलेल्या जिल्ह्यात गेल्या १२ दिवसांपासून सातत्याने नवे बाधित वाढत आहेत. बुधवारी आरटीपीसीआरच्या एक हजार २०१, तर ॲन्टिजेनच्या एक हजार ८०५ चाचण्यांच्या अहवालातून २८५ नवे रुग्ण समोर आले. दिवसभरात १९ रुग्ण कोरोनामुक्त (Corona) झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता एक हजार ३२ वर पोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यापैकी तब्बल एक हजार सात रुग्ण लक्षणेविरहित असून, ते गृहविलगीकरणातच आहेत. केवळ २५ रुग्णांमध्येच लक्षणे आहेत. पैकी सहा रुग्णांना सध्या ऑक्सिजनवर ठेवले आहे.

लाटेतील पहिला बळी

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरल्यानंतर नोव्हेंबरमध्ये एकाचा बळी गेला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी बुधवारी तिसऱ्या लाटेतील पहिल्या बळीची (Corona Death) नोंद झाली. जळगाव शहरातील ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या रुग्णाने कोविड प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता. त्याला सहव्याधी असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव, भुसावळात उद्रेक

नेहमीप्रमाणे जळगाव शहर व भुसावळला कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. बुधवारी जळगावात ८१ नवे बाधित आढळून आले, तर पाच रुग्ण बरे झाले. भुसावळ तालुक्यात तब्बल १०४ रुग्ण समोर आले, तर नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

SCROLL FOR NEXT