Chopda Accident Saam tv
महाराष्ट्र

Chopda Accident : अनियंत्रित बसने दुचाकीसह पायी चालणाऱ्यांना उडविले; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Jalgaon News : २० मे रोजी दुपारी लासूर- चोपडा हि बस येत चोपडा बसस्थानकाकडे येत होती. बारा मोहल्ला परिसरात असलेल्या मशिदीजवळील उतारावर बस चालक दीपक पाटील यांचा बसवरील ताबा सुटला

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी घेऊन मार्गस्थ झाली असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यात रस्त्यावरून जाणाऱ्यांना धडक देत बस पुढे जाऊन थांबली. यात एका दुचाकीस्वाराचा आणि पायी जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीज रोडवर घडली. तसेच या अपघातात दुचाकीस्वाराची पत्नी व अन्य एकजण जखमी झाले आहेत. 

जळगावच्या चोपडा शहरातील बारा मोहल्ला भागाजवळ २० मे रोजी दुपारी लासूर- चोपडा हि बस येत चोपडा बसस्थानकाकडे येत होती. बारा मोहल्ला परिसरात असलेल्या मशिदीजवळील उतारावर बस चालक दीपक पाटील यांचा बसवरील ताबा सुटला आणि भरधाव बसने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भयानक होती, की दुचाकीवरील दोघेजण दूरवर फेकले गेले. यात दुचाकीस्वार रवींद्र भिवसन बहारे (वय ३५) बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले. तर मृताची पत्नी गंभीर जखमी आहे. 

पायी चालणाऱ्या तरुणाचाही मृत्यू 

तसेच अपघातात रस्त्याने पायी चालणारा तरुण रईसखाँ रशीदखाँ पठाण (वय २९, रा. बारगनअली, चोपडा) याचा देखील बसच्या धडकेत मृत्यू झाला. तर सोबत असलेला त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की अपघात स्थळापासून बस चालकाने पुढच्या चाकाखाली अडकलेली दुचाकी अर्धा किलोमीटर त्रिवेणी चौकापर्यंत ओढत आणली. घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाली होती. 

चालक पोलिसात झाला जमा 

अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघी मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, बस चालक स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन जमा झाला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात चालक दीपक पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT