Chopda Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही कर्मचारी या कामासाठी टाळाटाळ करत असतात. त्यांना निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येत असते

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : विधानसभा निवडणुकीचे काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे. चोपडा तालुक्यातील अशा २१ कर्मचाऱ्यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही कर्मचारी या कामासाठी टाळाटाळ करत असतात. त्यांना निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येत असते. यात चोपडा तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अलका ताराचंद पाटील, चिंचखंड (ता. मुक्ताईनगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मेरासंग फेल्या पावरा, बोहाडी (ता. भुसावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रमाकांत महादेव मिसाळ, प्रशांत पंडित (पाचोरा), दिलीप मंगलदास सोनवणे (पडगाव खुर्द, ता. पाचोरा), विजय धनराज टाकणे (जिल्हा परिषद विभागप्रमुख, मुख्य कार्यालय), राजाराम भास्कर पाटील (जिल्हा परिषद शाळा, कंडारी, ता. भुसावळ), गणेश काशीनाथ गवळी (पंचायत समिती, अमळनेर), गणेश मोहन बागूल (जिल्हा परिषद शाळा, मोहाडी, ता. जळगाव), सुनील कन्हय्यालाल काटे (वालाजी सेकंडरी हायस्कूल, पिळोदे, ता. अमळनेर), मोहंमद अकबरखान मोहंमद अजमल खान (ॲँग्लो प्रायमरी ऊर्दू स्कूल, जामनेर, ता. जामनेर), शुभम यशवंत पाटील (सेकंडरी स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा), सय्यद शरीफ (अँग्लो ऊर्दू हायस्कूल, पाचोरा), अताउलना शहा अब्दुल्ला शक्षा (जिल्हा परिषद ऊर्दू शाळा, भादली), हर्शल ज्ञानेश्वर पाटील (एरंडोल), महेंद्र चुनिलाल पाटील (गौरीशंकर माध्यमिक शाळा, रवंजा, ता. एरंडोल), राजेंद्र यश ठाकरे (डी. एन. सीनिअर कॉलेज, फैजपूर, ता. यावल), मगतसिंग गंभीरराव निकम (जी. आर. पंडित सायन्स कॉलेज, जळगाव), सुनील काशीनाथ पाटील (नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी, ता. मुक्ताईनगर) यांची चोपडा विधानसभा मतदरासंघाच्या निवडणुकीसाठी साहित्यवाटप, तिसरे प्रशिक्षण व मतदान केंद्रावर कामासाठी नियुक्ती केली होती. 

दरम्यान हे सर्व कर्मचारी कर्तव्यावर गैरहजर राहिले व निवडणूक कामासाठी टाळाटाळ केली. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन सेटिंग व सीलिंग कामासाठी प्रा. शशिकांत शिवाजी पाटील यांची नियुक्ती केली असताना, ते परवानगी न घेता कर्तव्यावर गैरहजर राहिले. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या आदेश पाळले नाहीत, म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी निवडणूक कामासाठी टाळाटाळ केली. याबाबत चोपडा नायब तहसीलदार सचिन किसन बांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT