Jalgaon News Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: ‘उष्माघात’सदृश लक्षणांनी दोघांचा मृत्यू; चक्‍कर येवून कोसळले

‘उष्माघात’सदृश लक्षणांनी दोघांचा मृत्यू; चक्‍कर येवून कोसळले

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : तालुक्यातील मेहुणबारे व दरेगाव येथे उष्माघात (Jalgaon) सदृश लक्षणांनी दोघांचा मृत्यू झाला. यात दरेगाव येथील शेतमजूर व मेहुणबारे येथील राजेंद्र कोळी यांचा मृत्‍यू झाला आहे. (Breaking marathi News)

दरेगाव (Chalisgaon) येथील हरसिंग रायसिंग गायकवाड (वय ६०) या शेतमजुराचा शुक्रवारी दुपारी अकस्मात मृत्यू झाला. त्यांना कुठलाही आजार नव्हता. ते घरापासून गावातील काही अंतरावरील एका दुकानापर्यंत गेले. तेथून घरी आल्यावर ते एकाकी जमिनीवर कोसळले. शेजारील नागरिकांनी धाव घेऊन त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

मासे पकडताना आले चक्‍कर

दुसऱ्या घटनेत मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील इंदिरानगरातील राजेंद्र शिवाजी कोळी (वय ४५) हे शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास सहकाऱ्यांसह खडकीसीम धरणात काठावरील पाच ते सहा फूट पाण्यात चारचाकी वाहनाचे ट्युबवर बसून मासेमारीचे जाळे टाकून मासे पकडत होते. मासेमारी करीत असताना त्यांना अचानक चक्कर आल्यासारखे वाटले व ट्यूबवरून पाण्यात पडले. त्यांचे भाऊ व इतर साथीदारांनी त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढले व तत्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी लक्ष्मण कोळी याने दिलेल्या खबरीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : महापालिका विरोधात शिवसैनिकांच्या नदीत उड्या; कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Baby Care: लहान बाळांच्या त्वचेवर चुकूनही या ३ गोष्टी लावू नका; नाहीतर होईल हे मोठे नुकसान

Pune: हॉटेलमध्ये गेला, चहा अन् बन-मस्का मागवला, पहिल्याच घासात काचेचा तुकडा, पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेतील प्रकार | VIDEO

Kapil Sharma Earnings : कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो ‘इतके’ रूपये, आकडा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT