Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : दोन हजारांची लाच घेताना हवालदारासह एकजण ताब्यात

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील मौजे तरवाडे येथील तक्रारदाराचा गावातील एकाशी वाद झाला होता. समोरच्या व्यक्तीने तक्रारदाराविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता.

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी बीट हवलदाराला दोन हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. लाचखोर बीट हवालदारासह त्याचा पंटरला देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील मौजे तरवाडे येथील तक्रारदाराचा गावातील एकाशी वाद झाला होता. समोरच्या व्यक्तीने तक्रारदाराविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता. नंतर वाघळी बीटचे हवलदार जयेश रामराव पवार (वय ५०, रा. गायकेनगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांनी तक्रारदाराला त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तसेच त्रास न होऊ देण्यासाठी त्यांच्याकडे चार हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने (Dhule ACB) धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. 

सदर पथकाने १२ नोव्हेंबरला चाळीसगाव येथे सापळा रचला. हवालदार जयेश पवार यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये त्यांनी खासगी सुनील श्रावण पवार (वय ५२) यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना पकडले. संशयित जयेश पवार व सुनील पवार यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT