Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : कपडे इस्त्री करताना विजेचा झटक्याने इसमाचा मृत्यू

Chalisgaon News : शेतीचे काम करून ते कुटूंबाचा चरितार्थ चालवत होते. दरम्यान २७ मार्चला सकाळी ते घरीच कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करत होते.

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : घरी कपड्यांना इस्त्री करत असताना एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील खेडगाव या गावात घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात (Death) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

विजय माधवराव साळुंखे (वय ५७) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. विजय साळुंखे हे आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते कुटूंबाचा चरितार्थ चालवत होते. (Jalgaon) दरम्यान २७ मार्चला सकाळी ते घरीच कपड्यांना इस्त्री करण्याचे काम करत होते. इस्त्री करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार झटका बसला. (Electric Shock) विजेचा झटका बसल्याने ते फेकले गेले. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुटुंबीयांचा आक्रोश 

विजय साळुंके यांच्या मृत्यूची बातमी कळताच रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनवर तडवी हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : . चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

Pakistan Blast: इमारतीत भीषण स्फोट; पाकिस्तान हादरलं! ९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

Viral Video: शूज लपवण्यात मेव्हणीचा मास्टरस्ट्रोक; नवऱ्याचे शूज अशा ठिकाणी लपवले की शोधूनही सापडणार नाहीत!

SCROLL FOR NEXT