Chalisgaon News Railway Accident
Chalisgaon News Railway Accident Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: मुक्‍या प्राण्यांना वाचवायला धावला पण जीव गमावला; रेल्‍वे ट्रॅकवरील भीषण अपघात गुराख्यासह आठ जनावरांचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : धुळ्याकडून चाळीसगावकडे येणाऱ्या मेमू रेल्वेगाडीखाली सापडून गुराख्यासह सात गायी व एक म्हैस चिरडून ठार (Jalgaon News) झाल्याची घटना बुधवारी (२९ मार्च) चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील शिदवाडी गावाजवळ घडली. ही घटना इतकी विदारक आणि भीषण होती, की मृत जनावरांचे मांसाचे तुकडे रेल्वेरुळावर सर्वत्र विखुरले होते.

चाळीसगाव- धुळे रेल्वे मेमू ट्रेन बुधवारी दुपारी धुळ्याहून चाळीसगावकडे येण्यास निघाली. राजमाने स्थानक सोडल्यानंतर ही मेमू जामदा रेल्वेस्थानकाकडे येत असताना दुपारी चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास जामदा (Railway) रेल्वेस्थानकाच्या अलीकडे शिदवाडी गावाजवळ खांबा क्रमांक ३४४ जवळ जनावरांचा कळप रेल्वेरुळावर आला. त्याचवेळी मेमूचा वेग अधिक असल्याने गुराख्यासह ही जनावरे मेमू रेल्वेगाडीखाली (Accident) सापडली. त्यात एकापाठोपाठ एक अशा सात गायी व एक म्हैस अशी आठ जनावरे चिरडून मृत्युमुखी पडली. एक पारडू जबर जखमी झाले. .

दिव्यांग राजेंद्रने गमावला जीव

घटना अंगावर शहारे आणणारी होती. शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांची ही जनावरे होती. त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय ५०) जनावरे राखण्याचे काम करीत होते. रेल्वेरुळावर जनावरे गेल्याने आणि समोरून रेल्वे येत असल्याने सूर्यवंशी जनावरे हाकण्यासाठी धडपड करीत असतानाच दुर्दैवाने तेही रेल्वेखाली सापडून त्यांचाही करुण अंत झाला. सूर्यवंशी एका हाताने दिव्यांग होते. ते ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येऊन ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी आजपासून रुजू झाले होते. आज पहिल्याच दिवशी त्यांच्या मृत्यूने त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे.

नागरिकांची घटनास्थळी धाव

रेल्वेखाली जनावरे चिरडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडून काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटना घडताच परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गर्दी झाली होती. घटना कशी घडली हे नेमके समजून आले नाही. मात्र रेल्वेच्या धडकेने तब्बल आठ जनावरे चिरडून ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी ही जनावरे रेल्वेच्या धडकेने ठार झाली. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेनंतर धुळे- चाळीसगाव मेमू सुमारे तासभर शिदवाडी येथेच थांबून होती. त्यानंतर ती जामदा रेल्वेस्थानकावर नेण्यात आली. दरम्यान, सायंकाळी रेल्वेकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT