Jalgaon Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: तिच्‍या हिंमतीने वाचला मुलाचा जीव; सिद्धी आवाजाच्‍या दिशेने धावली नसती तर..

तिच्‍या हिंमतीने वाचल मुलाचा जीव; सिद्धी आवाजाच्‍या दिशेने धावली नसती तर..

साम टिव्ही ब्युरो

Jalgaon News: घरात हिटरमध्ये गरम पाणी घेत असताना तेरा वर्षीय मुलाला हिटरचा शॉक लागला. त्याचवेळी शेजारी राहण्याऱ्या (Jalgaon News) बारा वर्षांच्या मुलीच्या हा प्रकार लक्षात येताच, तिने मोठ्या हिमतीने तत्काळ विद्युत पुरवठा बंद केला. ज्यामुळे मुलाचा जीव वाचला. मुलाचा (Chalisgaon) जीव वाचवणारी ही मुलगी त्याच्यासाठी जणू देवदूत ठरल्याचे दिसून आलक्‍लाे. (Maharashtra News)

चाळीसगाव शहरातील संजय गांधीनगरातील रहिवासी सागर सपकाळ (वय १३) हा आठवीत शिकणारा मुलगा आजी व आईसोबत राहतो. त्याचे पितृछत्र हरपले असून आई धुणीभांडी व मोलमजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवते. सागरची आई नेहमीप्रमाणे सकाळी घरुन कामासाठी गेल्यानंतर सागर घरात एकटाच होता. आंघोळीसाठी हिटरमधून पाणी काढण्यासाठी तो गेला असता, त्याचा अचानक हिटरचा शॉक (Electric Shock) लागला.

सिद्धी धावत आली अन्‌

सागरची आजी शेजारी गेलेल्या होत्या. सागरला इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागताच त्याने जोराने आवाज दिला. तो ऐकून त्याच्या घराशेजारी राहणारी सिद्धी गायके (वय १२) ही सातवीची मुलगी धावतच सागरजवळ आली. तिला तिच्या क्लासमध्ये कोणालाही शॉक लागल्यानंतर तत्काळ काय करावे, याबाबत शिक्षकांनी शिकवलेले आठवले व त्यानुसार सिद्धीने लगेचच विद्युत पुरवठा बंद केला. या दरम्यान, आजूबाजूचे काही जण देखील धावत आले. विजेचा शॉक लागलेला असल्याने सागर प्रचंड घाबरलेला असल्याने तो जमिनीवर कोसळला होता.

क्‍लासमध्‍ये शिकविलेले होते लक्षात

त्याला आजूबाजूच्या लोकांनी लगेचच दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. सुदैवाने सिद्धीने वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अनर्थ टळला गेला. सिद्धीमुळे सागरचे प्राण वाचल्याने तिचे सर्वांनीच कौतुक केले. क्लासमध्‍ये आकाश धुमाळ हे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोगांची माहिती करुन देतात. एकदा विजेचा शॉक लागल्यानंतर तत्काळ काय करावे, हे सांगितले होते, जे मी लक्षात ठेवले होते. त्यानुसार, सागरला शॉक लागल्याचे कळताच मी सर्वप्रथम मुख्य वीज पुरवठ्याचे बटन बंद केल्‍याचे सिद्धी गायकेने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT