Chalisgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Crime : नवरदेवाची आई जेवायला बसताच साधली संधी; साडेदहा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घेऊन चोरटा फरार

Jalgaon News : लग्न लागल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत नवरदेवाची आई अंजली पाटील या जेवायला बसल्या होत्या. त्यांच्याजवळ साडेदहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी त्यांनी एका खुर्चीजवळ ठेवली

संजय महाजन

जळगाव : लग्न सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करत असतात. मात्र लग्न सोहळा आटोपल्यानंतर शेवटच्या पंगतीमध्ये जेवणासाठी बसलेल्या नवरदेवाच्या आईजवळ असलेली दागिन्यांची पिशवी घेऊन चोरटा पसार झाला. सदरची घटना चाळीसगाव शहरात आयोजित एका विवाह समारंभात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून तपास सुरु करण्यात आला आहे. 

भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील पाटील यांच्या कन्येच्या लग्नात हा चोरीचा प्रकार घडला आहे. सदरचा विवाह सोहळा चाळीसगाव शहरातील धुळे रस्त्यावर विराम लॉन्स याठिकाणी पार पडला. पण लग्न लागल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत नवरदेवाची आई अंजली पाटील या जेवायला बसल्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ सुमारे साडेदहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी होती. हि पिशवी त्यांनी एका खुर्चीजवळ ठेवली. 

चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

लग्नात वेगवेगळ्या नऊ प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी नवरदेवाची आई अंजली पाटील यांच्याकडे होती. जेवण करत असताना त्यांनी ही पिशवी खुर्चीजवळ खाली ठेवली होती. हि संधी साधत अल्पवयीन असलेल्या चोरट्याने त्यांची नजर चुकवून दागिन्यांची पिशवी लांबवली. हा सर्व प्रकार लॉन्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

नाशिकमध्ये धाडसी चोरी 

नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील गोडसे यांच्या बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातून साडे सोळा लाख रुपये किमतीचे २८ तोळ्यांचे दागिने भरदिवसा चोरले आहे. या घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून दुचाकीवर आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. पुढील तपास आता उपनगर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT