Chalisgaon Crime  Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Crime : क्रिकेट खेळण्यावरून वाद; मुंबई पोलिस दलातील तरुणाचा खून

Jalgaon News : चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या शुभम आगोणे हा तरुण मुंबईतील पोलिस दलात कार्यरत आहे. शुभम हा सुटीवर गावी आलेला होता

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : मुंबईच्या पोलिस दलात कार्यरत असलेल्या तरुणाचा क्रिकेटच्या वादातून खून झाल्याची घटना (Chalisgaon) चाळीसगाव शहरात १४ जानेवारीला सायंकाळी घडली. या घटनेमुळे शहरातील घाट रोड, पाटणादेवी रोड परिसरात तणावाचे वातावरण होते. (Crime News) पोलिस ठाण्याच्या परिसरातही मोठी गर्दी झाली होती. (Latest Marathi News)

चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या शुभम आगोणे हा तरुण मुंबईतील पोलिस दलात (Mumbai Police) कार्यरत आहे. शुभम हा सुटीवर गावी आलेला होता. गावी असताना त्याचा क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून काही जणांशी वाद झाला. या वादात शुभम आगोणे याला पाटणादेवी रोड परिसरातील बामोशीबाबा दर्गा परिसरात काही जणांनी मारहाण केली. (Jalgaon News) त्यात गंभीर जखमी झालेल्या शुभमला शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे शहरातील घाट रोड व पाटणादेवी रोड परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चारजण ताब्यात 

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. या खूनप्रकरणी तीन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT