Crime News Saam tv
महाराष्ट्र

हळदीच्या कार्यक्रमात विवाहितेला मारहाण

हळदीच्या कार्यक्रमात विवाहितेला मारहाण

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : चुलत दीराचे लग्‍न असल्‍याने हळदी कार्यक्रमाला गेले असता रात्री नाचण्यावरून एका विवाहितेला लाकडी दांड्यासह लोखंडी गजाने जबर मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात (Police) सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon chalisgaon crime news Beating a married woman in a haldi program)

शिवापूर (ता. चाळीसगाव) येथील राहुल पंडित चव्हाण यांच्या हळदीनिमित्त गुरूवार (१२ मे) राहत्या घरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हळदीला आलेली मंडळी डीजेवर नाचत होती. या दरम्‍यान काही मंडळी त्याठिकाणी जमली. नाचण्यावरून एका विवाहितेसह तिच्या नणंदला शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडा, लोखंडी गज व मोटारसायकच्या चैनने मारायला सुरवात केली. प्रवीण चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही जबर मारहाण केली.

महिलेला गंभीर दुखापत

अचानक झालेल्‍या मारहाणीत सदर महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद मोरसिंग पवार, मनोज मोरसिंग पवार, सुनीता मोरसिंग पवार, हारसिंग पंडित पवार, प्रदीप ममराज पवार, बादल पंडित पवार, रोहिदास हेमा पवार, जितेश संजय पवार, वनिता संजय पवार, प्रवीण पवार, संदीप रामसिंग राठोड, लहू रामसिंग राठोड, निलेश रोहिदास पवार, उमेश रोहिदास पवार, आकाश तुळशीराम राठोड व प्रकाश तुळशीराम राठोड (सर्व रा. शिवापूर ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीतांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT