Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: मध्यरात्री घरी आला, बिर्याणी खाल्ली; २ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला

मध्यरात्री घरी आला, बिर्याणी खाल्ली; २ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : पिंप्री प्र.दे. (ता. चाळीसगाव) येथे इंदिरानगर भागात कोयत्याचा धाक दाखवून दोन महिन्याच्या चिमुकलीचा रूमालाने तोंड दाबून खून (Crime News) केल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असुन याप्रकरणी एका विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

पिंप्री प्र.दे. (ता. चाळीसगाव) येथील शोभना सोनु ठाकरे (कोळी) (वय 27) ही महिला पती, मुले व आजोबांसह राहते. तिचा पती मोलमजुरी करून उदरनिर्वाह (Jalgaon) भागवतो. दरम्‍यान 11 ऑक्‍टोंबरला रात्री दहाच्‍या सुमारास शोभना हिचे पतीशी घर खर्चाला पैसे देत नाही; यावरून किरकोळ वाद झाला. या वादातून (Crime) दोघे पती– पत्नी जेवण न करता झोपुन गेले. यानंतर आज (12 ऑक्‍टोंबर) पहाटे दोन वाजेच्या सुमारास शोभना हिला घरात कुणीतरी आल्याचा आवाज आला. अचानक मागच्या दारातून एक व्यक्ती येतांना दिसला. त्याच्या हातात लोखंडी कोयता होता.

बिर्याणीवर मारला ताव मारत कोयत्‍याचा धाक

पिंप्री प्र.दे गावातीलच अरविंद कैलास पाटील (वय 40) हा असल्याचे शोभनाने ओळखले. त्याने शोभनाच्या जवळ येत कोयत्याचा धाक दाखविला. आरडाओरड करू नको, तुला जीवंत सोडणार नाही; अशी धमकी दिली. त्याचवेळी त्याने पातेल्यातील बिर्याणी ताटात घेऊन खाण्यास सुरवात केली. तेवढ्यात उठून महिलेकडे कोयता उगारून त्याने खिशातील रूमाल काढला व मुलगी गुंजन सोनु ठाकरे (वय 2 महिने) हिच्या तोंडावर जोरात दाबून ठेवला. घाबरलेल्या शोभनाला काय करावे काहीच सुचत नव्हते. अरविंद हा घराबाहेर पळू लागल्याने शोभना हिने पतीला उठवून तो गुंजनला मारून पळाला; असे सांगितले. त्यावेळी सोनु ठाकरे हा अरविंदचा पाठलाग केला पण सापडला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

SCROLL FOR NEXT