Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात; घरापासून तीन किलोमीटर अंतरावरच भाविकांवर काळाचा घाला, तीघांचा जागीच मृत्यू

Jalgaon News : मंदिराचे काम पूर्ण झाल्याने शिवलिंग घेण्यासाठी आज (१५ मार्च) ओंकारेश्वरला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी खाजगी गाडी देखील करण्यात आली होती.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : परिसरात मंदिर उभारणी झाल्याने प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी शिवलिंग आणावयाचे होते. यामुळे काहीजण (Jalgaon) शिवलिंग घेण्यासाठी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे जाण्यासाठी सकाळीच निघाले. मात्र घरापासून अवघे तीन किलोमीटर अंतरावर पोहचताच काळाने घाला घातला. बांभोरी (ता. धरणगाव) येथे सकाळी सात वाजता हा (Accident) अपघात घडला असून यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण जखमी आहेत. (Breaking Marathi News)

जळगाव शहरातील खोटेनगर परिसरातील साईनगर या भागातील भूषण सुभाष खंबायत (वय ३५), विजय हिम्मत चौधरी (वय ४०), तुषार वासुदेव जाधव (वय २८) यांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत. खोटेनगरच्या साईनगर भागात मंदिर उभारणी करण्यात आली आहे. यात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्याने शिवलिंग घेण्यासाठी आज (१५ मार्च) ओंकारेश्वरला (Madhya Pradesh) जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी खाजगी गाडी करण्यात आली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवघ्या पाच मिनिटात अपघाताची आली बातमी 

ठरलेल्या नियोजनानुसार परिसरातील ७ ते ८ जण सकाळी पावणेसातच्या सुमारास घरून निघाले. घरातील सर्व मंडळी व मंदिर ट्रस्टीची भेट घेऊन भगवान शंकरचा जयजयकार करत मार्गस्थ झाले. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी (ता. धरणगाव) गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने या भाविकांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चजण जखमी असून त्यांना उपचारासाठी जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञान पाजळणाऱ्या पुणेकरांना परदेशी नागरिकानं शिकवला धडा|VIDEO

माझ्या बायकोला घरी पाठवा हो....सासूच्या पायावर लोटांगण घालून जावई धायमोकळून रडू लागला, Viral Video बघून काय म्हणाल?

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी,बॉम्बशोध पथक, डॉग स्कॉड जिल्हा न्यायालयात दाखल

अकरा वर्षाच्या मुलाचा विचित्र प्रकार, शाळेत पुस्तकांसोबत आणलं कंडोम, मुख्याध्यपकांचा चढला पारा

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT