Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike: वीज पडून दोन महिलांचा मृत्यू; शेतातून घरी परतताना घटना

Jalgaon News : वीज पडून दोन महिलांचा मृत्यू; शेतातून घरी परतताना घटना

Rajesh Sonwane

वरणगाव (जळगाव) : जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यापासून अधून मधून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain) होत आहे. या दरम्यान दिवसभर शेतात काम केले. यानंतर पावसाळा सुरवात झाल्याने शेतातून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन महिलांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा (Jalgaon) मृत्यू झाला. ही घटना सुसरी (ता. भुसावळ) शेतशिवारात घडली. (Breaking Marathi News)

जळगाव जिल्ह्यात २६ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाली. यात भुसावळ तालुक्यात मंगळवारी (ता. २६) सकाळपासून उघडीप असल्याने शेतकरी वर्ग मजुरांसह शेतात गेले होते. (Lightning Strike) सुसरी येथील शेतमजूर रवींद्र सदाशिव तळेले (वय ४०), मीनाक्षी रवींद्र तळेले (३४), अनिता ऊर्फ ममता विनोद पाटील (३३, सर्व रा. सुसरी) हे विल्हाळे शिवारातील शेतात कामासाठी गेले होते. दरम्यान दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. अचानक पाऊस आल्याने यामुळे त्यांची घरी जाण्याची तयारी सुरु झाली. 

एक महिला जखमी 

रवींद्र तळेले हे जनावरांचे वैरण चिखलाने घाण होईल म्हणून ते बैलगाडीत चार टाकण्यासाठी गेले. त्यांच्या पाठोपाठ मीनाक्षी तळेले व अनिता पाटील या येत होत्या. या वेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळी शेजारील शेतात वत्सलाबाई आनंदा तळेले (वय ५५) यांनाही जबर झटका (Bhusawal) बसल्याने त्या जखमी झाल्या असून, रवींद्र तळेले हे त्या महिलांपासून काही अंतरावर असल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. या घटनेची फिर्याद पोलिसपाटील नितीन पुंडलिक पाटील यांनी दिल्याने वरणगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

SCROLL FOR NEXT