Indian Railway Saam tv
महाराष्ट्र

रेल्‍वेतील फुकट्या प्रवाशांकडून बारा कोटींचा दंड वसूल

रेल्‍वेतील फुकट्या प्रवाशांकडून बारा कोटींचा दंड वसूल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम एक एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. एक एप्रिल ते १५ मे २०२२ या कालावधीत तिकीट (Jalgaon News) तपासणीसाठी १ लाख ५० हजार २५१ फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून १२ कोटी ४६ लाख ८३ हजार ४३४ दंड वसूल करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. (jalgaon bhusawal fine of Rs 12 crore was levied on free passengers on the railways)

भुसावळचे (Bhusawal) वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. शिवराज मानसपूरे यांच्या मार्गदर्शनानुसार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुणकुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक अनिल पाठक, विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षी १ एप्रिल ते १५ मे २०२१ या कालावधीत ७७ हजार ९२३ केसेसद्वारे ६ कोटी ३० लाख ७६ हजार ९८८ एवढा दंड वसूल करण्यात आला होता.

दरम्यान, उत्तम सुरक्षितता (Indian Railway) आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी रेल्वेने ट्रेन क्रमांक १५६४५/१५६४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेसचा शेवटचा रेक कायमस्वरूपी एलएचबी डब्यांसह बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. एलएचबी कोचची सुधारित संरचना असलेली ट्रेन आता २५ मे २०२२ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस, त्याच दिवसापासून गुवाहाटी येथून चालेल. सुधारित संरचना अशी : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार, १ जनरेटर व्हॅन, असे स्वरूप राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अमरावती जिल्ह्यातील काय स्थिती, कुणाला आघाडी?

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT