चार एकर ऊसासाठी 45 हजाराची मागणी; ऊस तोड अर्ध्यात टाकून मजूर गायब

चार एकर ऊसासाठी 45 हजाराची मागणी; ऊस तोड अर्ध्यात टाकून टोळी निघून गेली
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

लातूर : तालुक्यातील गाधवड येथील रमेश साहेबराव कदम यांच्या 4 एकर ऊसाची तोड करण्यासाठी 45 हजार रुपयाची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याने 42 हजार पाचशे रुपयांची जमवाजमव केली. पण केवळ अडीच हजार रुपये कमी असल्याने (Sugarcane) ऊस तोड टोळी शेतातून निघून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विशेष बाब रमेश कदम हे विकास साखर कारखान्याचे सभासद असून असाही वाईट अनुभव आल्याने पुरते हतबल झाले आहेत. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय कसा देतील हीच अपेक्षा शेतकऱ्याला आहे. (latur news sugarcane laborer disappears after throwing the cane in half)

सध्याला अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असताना संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका असे शासन आदेश आहेत. राज्यात आणि देशात मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देणार काम केले. पण काल रात्रीला विचित्र अनुभव लातूर तालुक्यातील गाधवड येथील रमेश साहेबराव कदम या शेतकऱ्याला आला. 4 एकर ऊसाची तोड करण्यासाठी तब्बल 45 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याने 42 हजार पाचशे रुपयांची जमवाजमव केली. केवळ अडीच हजार रुपये कमी असल्याने ऊसतोड करणारे निघून गेल्याने शेतकरी (Latur News) पुरता हतबल झाला आहे. आता साखर कारखान्याने दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी रमेश कदम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com