Bhusawal News  Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal News : दरोड्यापूर्वीच सात संशयीत ताब्यात; भुसावळात पोलिसांची कारवाई, तलवारीसह दोन गावठी पिस्टल जप्त

Jalgaon News : मध्यरात्रीच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलिस महामार्गावर गस्त घालत होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांना काहीजण संशयितपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. या सात संशयित दिसल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संजय महाजन

जळगाव : भुसावळ शहरात क्राईमच्या घटना नेहमीच घडत असतात. यात भुसावळ शहरात रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्याचा दरोडेखोरांचा डाव फसला आहे. दरोडा टाकण्यापूर्वीच सात दरोडेखोरांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. 

मध्यरात्रीच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलिस महामार्गावर गस्त घालत होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांना काहीजण संशयितपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. या सात संशयित दिसल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पथकाने पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या सातही संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये मध्यप्रदेशातील खंडवासह फैजपूर, भुसावळ येथील संशयितांचा समावेश आहे. यातील काही संशयीत हे हिस्ट्रीशिटर आहेत. हे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते की इतर घातपात करणार होते याची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. 

संशयितांकडून शस्त्र जप्त 

दरम्यान या संशयितांकडे असलेले चॉपर, तलवारीसह गावठी पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहे. या सातही जणांची चौकशी सुरु असून यांनी केलेले अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT