Bhusawal Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Crime : मुंबईला चल म्हणून सांगत होता, बायकोनं नकार दिला; नवऱ्यानं रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य

Jalgaon News : दोन दिवसांपासून अक्षय मुंबईवरून पत्नी वर्षाला मुंबई घेऊन जाण्यासाठी भुसावळात नातेवाइकांकडे आला होता.

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : भुसावळ शहरातील द्वारकानगर परिसरात कौटुंबिक वादावरून एका विवाहित महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर संशयित पती अक्षय आप्पासाहेब गुंजाळ फरारी झाला होता. रेल्वेने प्रवास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाने शिताफीने त्याला मनमाड रेल्वेस्थानकावरून संशयितास आठ तासांत ताब्यात घेतले.

वर्षा गुंजाळ असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. मुंबईत वास्तव्यास असताना पती- पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने विवाहिता वर्षा गुंजाळ चार महिन्यांपासून भुसावळच्या (Bhusawal) आजी रंजना प्रकाश यशोदे यांच्यासोबत राहत होती. दोन दिवसांपासून अक्षय मुंबईवरून पत्नी वर्षाला मुंबई घेऊन जाण्यासाठी भुसावळात नातेवाइकांकडे आला होता. राग सोडून मुंबईला चल, असा तो हट्ट करीत होता. (Crime News) मात्र, वर्षाने नकार दिल्याने अक्षयच्या राग विकोपाला गेला. 

दरम्यान २९ ऑक्टोम्बरला आजी दुपारी चारच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेली होती. त्याचा फायदा घेत संशयित अक्षय गुंजाळ याने घरात प्रवेश करून वर्षाच्या डोक्यात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून फरार झाला. घरात रक्ताचा थारोळ्यात वर्षा पडून होती. यात तिचा मृत्यू झाला होता.

तिची आजी घरी आली असता घटना उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे रिजर्व अधिकारी आर. के. सिंग व निरीक्षक पी. आर. मीना यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता तो मनमाड येथे असल्याची माहिती मिळाली. मनमाड रेल्वे सुरक्षा बल विभागाचे उपनिरीक्षक दीपक गायकवाड यांनी रेल्वे स्थानकावर शोघ घेत रात्री अकराच्या सुमारास संशयित अक्षय गुंजाळ रेल्वेस्थानकावर झोपलेला मिळून आला. त्यास तत्काळ ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

Kitchen Tips: लोखंडाच्या कढईत या भाज्या चुकूनही करू नका, भाजी होईल खराब

Maharashtra Politics: धुसफूस संपली! फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब

विरोधी पक्षनेतेपदावरून शिंदेसेनेनं जाधवांना डिवचलं, आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद सत्य की अफवा?

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

SCROLL FOR NEXT