Bhusawal Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Crime News: खळबळजनक..पहाटेचा थरार; वयोवृद्ध आईसह पत्नीची हत्‍या

खळबळजनक..पहाटेचा थरार; वयोवृद्ध आईसह पत्नीची हत्‍या

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : रेल्‍वेत कर्मचारी असलेल्‍या इसमाने एकाचवेळी आई व पत्‍नीचा खून केल्‍याची धक्‍कादायक घटना आज सकाळी भुसावळ (Bhusawal) शहरात उघडकीस आली आहे. दुहेरी खुनाच्‍या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून (Police) पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण हा रेल्वेत नोकरीला आहे. तो आपली आई आणि पत्नीसह वास्‍तव्‍यास होता. हेमंत याचा काही महिन्‍यांपुर्वीच विवाह झाला होता. कौटुंबिक वाद (Crime News) होत असल्‍याने या वादातून त्याने आई सुशीलादेवी (वय ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण (वय २४) यांना तव्याने मारहाण करत हत्‍या केली.

मध्‍यस्‍थी करायला गेलेला शालक जखमी

दरम्‍यान हेमंत याचा शालक ॠषभ हा त्याच्या घरी आला होता. पती– पत्‍नीमध्‍ये वाद हेात असल्‍याने आई व शालक मध्‍यस्‍थी करायला गेले. यात हेमंतने आईचा देखील खून केला. तर शालकावर देखील प्राणघातक हल्ला केला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये पोहचले असून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT