Parbhani News : रागाच्या भरात दाम्पत्याने संपवलं जीवन; दाेन चिमुकली झाली पाेरकी, गाव गहिवरलं

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
parbhani news, palam
parbhani news, palamsaam tv

Parbhani Crime News : पती पत्नी शेताकडे जात असताना वाटेत दाेघांत वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ पत्नीनेही पतीच्या कृत्याचे अनुकरण केले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. (Maharashtra News)

parbhani news, palam
Unseasonal Rain News : सातारा, साेलापूरला पावसानं झाेडपलं; काेल्हापूरात मंडप काेसळला, पाहूणे मंडळी जखमी

ही घटना पालम (palam near parbhani) तालुक्यातील नाव्हा येथे घडली. या दाम्पत्यास दोन वर्षाची मुलगी, सहा महिन्याचा मुलगा आहे. दाेघांच्या आत्महत्येने दोन्ही अपत्य पोरके झाली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुधाकर रंगनाथ केडाळे (वय 29) आणि ज्योती सुधाकर केडाळे (वय 27) अशी आत्महत्या केलेल्या पती (husband), पत्नीचे (wife) नाव आहे.

parbhani news, palam
Nitesh Rane On NCP : तू इथं का दिसताेयस, जयंत पाटलांच्या समर्थनार्थ आंदाेलकांना गेले फाेन ? नितेश राणे

पाेलिसांनी घटनेबाबत दिलेली माहिती अशी - सुधाकर आणि त्यांची पत्नी ज्योती हे दोघेजण सोमवारी सकाळी अकरा वाजता शेतात जात होते. वाटेमध्ये त्यांचा वाद झाला. रागाच्या भरात सुधाकर केडाळे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठोपाठ पत्नीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com