Bhusawal Crime Bhusawal Crime
महाराष्ट्र

Bhusawal Crime : बंदुकीचा धाक दाखवून बारा लाखांची रोकड लांबविली; जामनेर रस्त्यावरील घटना

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथून दुचाकीवर एक तरुण बॅग घेऊन जामनेरच्या दिशेने जात होता. दरम्यान तरुणाजवळ असलेल्या बॅगमध्ये रोकड असल्याची पाळत ठेवून तीन जण दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत होते

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : बागेत पैसे घेऊन जाणाऱ्या तरुणाला दुचाकीने आलेल्या तिघांनी अडवत बंदुकीचा धाक (Crime News) दाखवून धमकावले. यानंतर तरुणाजवळ असलेली १२ लाखाची रक्कम घेऊन फरार झाल्याची घटना जामनेर रोडवर ३ मार्चला दुपारच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील नशिराबाद येथून दुचाकीवर एक तरुण बॅग घेऊन जामनेरच्या दिशेने जात होता. दरम्यान तरुणाजवळ असलेल्या बॅगमध्ये रोकड असल्याची पाळत ठेवून तीन जण दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत होते. (Jamner) जामनेरकडे जाणाऱ्या महादेव माळ फाट्याजवळ रस्त्यावर दुचाकी आडवी लावून तिघांनी गावठी पिस्तूल तरुणाच्या डोक्याला लावून त्याच्याकडून पैशाची बॅग हिसकावली व तेथून दुचाकीने पसार झाले. बॅगमध्ये अंदाजे १२ लाखांची रोकड होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

ही घटना भुसावळ (Bhusawal) तालुका पोलिस ठाणे हद्दीत घडली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. या घटनेचा वरिष्ठ अधिकारी व पोलिस उपअधीक्षक कसून तपास करीत आहेत. अद्यापपर्यंत घटनेसंदर्भात कुठलीही सविस्तर माहिती न मिळाल्याचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थी नागपूरचा अन् नीट परीक्षेचं केंद्र अबुधाबीत; पेपरफुटीनंतर NTAचा आणखी गजब कारभार

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT