Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : वडिलांचा अपघात झाल्याने मुलीने घेतली जबाबदारी; दुर्दैवी घटनेत मुलीचा मृत्यू

Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील लोंढवे शिवारात १२ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर- धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्याच्या पुढे अपघात घडला. यात भाग्यश्री दीपक पाटील (वय २२) असे या तरुणीचा मृत्यू झाला

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : वडील दूध वाटपाचा व्यवसाय करायचे. त्यांना हातभार म्हणून मुलगी देखील मदतीस उभी राहायची. दरम्यान वडिलांचा अपघात झाल्याने त्यांना दुचाकी चालविणे शक्य नव्हते. यामुळे सर्व जबाबदारी मुलीने घेतली. मात्र दुर्दैवाने दूध वाटप करण्यासाठी गेलेल्या मुलीच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली. यात तिचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडली आहे. 

अमळनेर तालुक्यातील लोंढवे शिवारात १२ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर- धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्याच्या पुढे अपघात घडला. यात भाग्यश्री दीपक पाटील (वय २२) असे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे येथील रहिवासी असलेली भाग्यश्री पाटील ही वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावत होती. मोटर सायकलवरून दुधाचे कॅन बांधून एकटी दूध वाटपासाठी जात होती. 

वडिलांच्या अपघातानंतर घेतली जबाबदारी 

दरम्यान दूध वाटपासाठी गेलेल्या दीपक पाटील यांचा दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून अपघात झाला होता. यामुळे डॉक्टरांनी त्यांना दुचाकी चालविण्यास मनाई केली होती. त्यामुळे मुलगी भाग्यश्री हिने सर्व जबाबदारी सांभाळत दूध ने आण करणे तसेच वाटप करण्याचे काम करत होती.

दूध वाटपासाठी जाताना झाला घात  

तर १२ मे रोजी भाग्यश्री हि दूध वाटपासाठी गेली होती. यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मोटरसायकलने दुधाचे कॅन घेऊन अमळनेर येथे जाण्यासाठी निघाली. याच वेळी लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटरसायकल रस्त्यावर घसरली. यात भाग्यश्री खाली पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी तिला रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अमळनेर पोलिसात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025 : मुंबादेवी ते महालक्ष्मी, मुंबईतील ५ प्रसिद्ध देवीची मंदिरे

Marathi Sahitya Parishad: मराठी साहित्य परिषदेत राडा; निषेध नोंदवणाऱ्यांना धक्काबुक्की|Video

Dombivli : प्रेमाचा दुर्दैवी शेवट! डोंबिवलीत २१ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं, ११ व्या मजल्यावरुन मारली उडी

Sunday Horoscope: रविवारचा दिवस कसा जाणार? आवडत्या व्यक्तीशी झालेलं भांडण आजतरी मिटेल का? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण सोडणार, उपोषणकर्ते दिपक बोऱ्हाडे उपोषणावर ठाम...

SCROLL FOR NEXT