Amalner News Car Fire Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

Jalgaon News : राजस्थानमधील काही संसार उपयोगी वस्तू विक्रेत्यांनी अमळनेर शहराच्या बाहेर आपले बस्तान बांधले आहे. दिवसभर साहित्य विकून हे विक्रेते कारमध्येच आपला विसावा घेत असतात

संजय महाजन

जळगाव : रात्रीच्या सुमारास उभ्या कारला अचानक लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाले आहेत. (Fire) आग लागली तेव्हा दोघेजण कारमध्ये झोपलेले होते. ही घटना (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

राजस्थानमधील काही संसार उपयोगी वस्तू विक्रेत्यांनी अमळनेर शहराच्या बाहेर आपले बस्तान बांधले आहे. दिवसभर साहित्य विकून हे विक्रेते कारमध्येच आपला विसावा घेत असतात. दरम्यान २६ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास (Car Fire) देखील अशा प्रकारे विसावा घेत असताना कारमध्ये अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. यावेळी कारमध्ये झोपलेल्या दोघांना आगीचे चटके बसल्याने ते भाजले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारला आग लागल्यानंतर वेळीच कारमधून ते बाहेर पडण्यात त्यांना यश.मिळाल्याने दोघांचा जीव वाचला असून अनर्थ टळला आहे. या घटनेत परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती कळवतात काही वेळात अग्निशनमबंब (Fire Brigade) दाखल होऊन त्यांनी आग विझविली. मात्र त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT