Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : वरिष्ठांच्या नावाने मागितली लाच; हवालदारासह एकजण ताब्यात

Amalner News : हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.

Rajesh Sonwane

जळगाव : अमळनेरमध्ये बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणार्‍रे डंपर अडवून वरिष्ठांच्या नावाने हफ्ता म्हणून ३० हजारांची (Bribe) लाच मागितली. लाचेची रक्कम पंटराच्या माध्यमातुन स्वीकारताना हवालदाराला (Dhule ACB) धुळे एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. जळगाव जिल्ह्यात लाच स्वीकारण्याची दुसरी कारवाई झाली आहे. (Breaking Marathi News)

हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. अमळनेर शहरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदाराचे बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. हे साहित्य वाहतूक करत असलेल्या डम्परला हवालदार घनश्याम पवार (Jalgaon) यांनी ७ जानेवारीला अडवत पोलीस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजार रुपयांची मागणी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे एसीबीकडे तक्रार 

तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून केल्यानंतर धुळे एसीबीने ९ जानेवारीला पडताळणी करत हवालदार पवार यांनी ३० हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान हवालदाराचा खाजगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितले. त्यानुसार रक्कम स्वीकारताना इम्रान खान यास व नंतर घनश्याम पवार यांना एसीबीने अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT