Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : मित्रा-मित्रांमध्ये पोहण्याची शर्यत लागली, तलावाच्या मध्यभागी गेला अन् दम लागला, एकुलत्या एक मुलाचा बुडून मृत्यू!

Jalgaon News : जयेश व त्याचे दोघे मित्र हे मारवड रस्त्यावरील धार गावाजवळील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना त्यांच्यात स्पर्धा लागली.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : चांगला पाऊस झाल्यामुळे धरण, तलाव पाण्याने भरले आहेत. यामुळे तलावात पोहण्यासाठी गावातील मुले जात आहेत. दरम्यान असे पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असताना मित्रांमध्ये पोहण्याची स्पर्धा लागली. यात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील धार येथे घडली.

अमळनेर (Amalner News) तालुक्यातील कंडारी येथील जयेश दीपक पाटील (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. जयेश व त्याचे दोघे मित्र हे मारवड रस्त्यावरील धार गावाजवळील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना त्यांच्यात स्पर्धा लागली. या स्पर्धेत जयेश तलावाच्या मध्यभागी गेला. मात्र, जास्त दमल्यामुळे त्याला बाहेर काठावर येणे शक्य झाले नसल्याने तो पाण्यात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मारवड पोलिसांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी जी. एम. पाटील यांनी तपासून त्यास (Death) मृत घोषित केले. 

एकुलता एक मुलगा गेला 

जयेश हा शिक्षणासाठी शहरातील अयोध्यानगरात खोली करून राहत होता. प्रताप महाविद्यालयात अकरावी केल्यानंतर त्याने बारावीसाठी मारवड येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. जयेश हा दीपक पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. दीपक पाटील शेतकरी असून जयेशच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबाने हंबरडा फोडला. मारवड पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील शिक्षकेत्तर भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षकेत्तर भरती बंदी उठली

Parbhani health department: गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई; परभणीतील आरोग्य विभागाचे दोन प्रमुख अधिकारी निलंबित

Accident News : भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

Stomach gas: सतत पोटात गॅस होतोय तर हे 4 उपाय करा; 2 मिनिटांत मिळेल आराम

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस! पुण्यासह १० जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT