Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वेस्टइंडीजमधील भारताचे राजदूत डॉ. श्रीनिवासा यांची मंगळग्रह मंदिराला भेट

वेस्टइंडीजमधील भारताचे राजदूत डॉ. श्रीनिवासा यांची मंगळग्रह मंदिराला भेट

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : वेस्टइंडीजमधील भारताचे राजदूत डॉ. के. जे. श्रीनिवासा यांनी अमळनेर (Amalner) येथील मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंगळ ग्रहाची महापूजा केली. पहाटे श्रीनित्यप्रभात मंगलाभिषेक केल्यानंतर मनाला अलौकिक मनःशांती लाभली असून, मन प्रसन्न झाले असल्‍याची प्रतिक्रीया त्‍यांनी यावेळी दिली. (Live Marathi News)

वेस्टइंडीजमधील गयाना देशाचे राष्ट्रपती मोहम्मद अली इरफान हे भारत दौऱ्यावर होते. या दौऱ्याप्रसंगी भारताचे राजदूत डॉ. के. जे. श्रीनिवासा हे देखील त्यांच्यासमवेत भारताच्या दौऱ्यावर आले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराला भेट दिली. दरम्यान यावेळी मंगळ ग्रह संस्थांनच्या वतीने डॉ.के जे श्रीनिवासा यांचा सन्मान करण्यात आला.

धर्म, अध्‍यात्‍मावर श्रद्धा

श्री मंगळग्रह मंदिरात पहाटे श्रीनित्यप्रभात मंगलाभिषेक केल्यानंतर मनाला अलौकिक मनःशांती लाभली असून, मन प्रसन्न झाले आहे. मंदिरात स्वच्छ, सुंदर व प्रसन्न वातावरणात सकारात्मक उर्जेची अनुभूती मिळाली. मी जरी अधिकारी असलो तरी धर्म व अध्यात्मावर माझी श्रद्धा आहे, असे प्रतिपादन वेस्टइंडिज येथील भारतीय राजदूत डॉ. के.जे. श्रीनिवासा यांनी केले. भारताच्या परोपकारी, सहिष्णू धोरणाबाबतही त्यांनी भाष्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव

Tuesday Horoscope : आनंदाला सीमा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार घडणार

Gulgule Recipe: घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट गुळगुळे कसे बनवायचे; वाचा सोपी रेसिपी

Pearl Jewellery: ऑफिस वेअर किंवा पार्टीसाठी ट्राय करा 'या' ट्रेंडी आणि सुंदर पर्ल ज्वेलरी

Mumbai Local: मुंबईच्या लोकलमधील गर्दी होणार कमी; १५ डब्यांची लोकल कधी धावणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT