Amalner Tragic Incident, Harshal Yogesh Patil  Saam tv
महाराष्ट्र

Tragic Incident : घरी कोणी नसताना घडले अघटीत; ११ वर्षीय मुलाचा मृत्यू, अमळनेरमधील दुर्दैवी घटना

Amalner News : अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल योगेश पाटील (वय ११) हा अमळनेरमधील सानेगुरुजी शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता.

Rajesh Sonwane

Amalner News :

अमळनेर (जळगाव) : आठ- दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने पाणी लवकर भारत यावे यासाठी पाण्याची मोटार (Jalgaon) लावली जाते. त्यानुसार नळाला पाणी आल्याने घरातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय मुलाला जोरदार झटका बसला. यात त्याचा मृत्यू (Death) झाला. (Live Marathi News)

अमळनेर (Amalner) तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्शल योगेश पाटील (वय ११) हा अमळनेरमधील सानेगुरुजी शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. त्याचे वडील योगेश पाटील शेती करतात. शिक्षणासाठी तो आई- वडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील अमळनेरमधील  साई गजानन नगरात वास्तव्यास होता. दरम्यान सोमवारी त्याचे आई- वडिल सबगव्हाण येथे शेतात गेले होते. तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाऊ घरी येईपर्यंत..  

दरम्यान दुपारी एकला नळांना पाणी आल्याने हर्शल हा मोटार सुरू करण्यासाठी गेला. पिन जोडत असताना त्याचे हात ओले (Electric Shock) असल्याने त्याला विजेचा धक्का बसला. यात तो जीन्याखाली कोसळला व मृत झाला. मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी आला असता, त्याला हर्शल जिन्याखाली पडलेला आढळून आला. तोपर्यंत उशीर झाल्याने हर्शलचा मृत्यू झाला होता. हर्शलचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेला. तेथे डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT