Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : कंत्राट मिळवून देण्याच्या नावाने तरुणाची फसवणूक; साडेअकरा लाख घेत देण्यास नकार

Jalgaon News : ऑप्टिकल फायबर कंत्राट देतो, असे सांगून १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार विजय याने टप्प्याटप्याने ११ लाख ५० हजार रुपये दिले.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : ऑप्टिकल फायबर टाकण्याच्या कामाचा कंत्राट मिळवून देण्याचे सांगत जामनेरच्या एका तरुणाची साडेअकरा लाखांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान पैशांची मागणी केल्यानंतर सदर तरुणास धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमळनेरच्या (Amalner News) विजय धनराज पाटील या तरुणाची फसवणूक झाली आहे. अमळनेरमध्ये व्यंकटेश इंटरप्रायझेस नावाची फर्म असून १५ ऑगस्ट २०२० ला सायंकाळी पाच वाजता त्यांच्या ओळखीचे जामनेर येथील राहुल दत्तात्रय चव्हाण, सागर दत्तात्रय चव्हाण या दोघांनी विजयच्या घरी आले. त्यांनी विजयला ऑप्टिकल फायबर कंत्राट देतो, असे सांगून १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार विजय याने टप्प्याटप्याने ११ लाख ५० हजार रुपये दिले. 

पैशांची मागणी केल्याने जीवे मारण्याची धमकी 

मात्र राहुल आणि सागर या दोघांनी ऑप्टिकल फायबर केबलचा ठेका दिला नाही. यामुळे विजयने पैशाची मागणी केली असता (Fraud) दोघांनी तगादा लावू नको; अन्यथा तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. अमळनेर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस न वापरता ५ मिनिटांत बनवा मिक्स फ्रूट आणि दह्याचं हेल्दी डेझर्ट, आईस्क्रिमही विसरून जाल

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Mumbai Crime : फैय्याजला मुंबईतील ३० हजार नागरिकांना का मारायचं होतं? चौकशीदरम्यान सांगितलं खरं कारण

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

SCROLL FOR NEXT