Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : बसच्या प्रतीक्षेत उभ्या दोन बहिणींना भरधाव कारने उडविले; एकीचा मृत्यू

Jalgaon News : गावी चावलखेडा (ता. धरणगाव) येथे जाण्यासाठी आई, बहीण व मामासह १७ नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान लोण फाट्यावर बसची वाट पाहत उभे होते

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : सुटीत मामाच्या गावाला आले असता गावी जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना लोण फाट्यावर घडली आहे. या प्रकरणी मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर (Amalner News) तालुक्यातील लोण बु. येथे मामाकडे आलेल्या तमन्ना सिद्धार्थ भालेराव (वय ११) व अर्चना सिद्धार्थ भालेराव (वय ७) ह्या गावी चावलखेडा (ता. धरणगाव) येथे जाण्यासाठी आई, बहीण व मामासह १७ नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान लोण फाट्यावर बसची वाट पाहत उभे होते. याचवेळी अमळनेरकडून भरधाव वेगाने आलेल्या कारने अर्चना व तमन्ना या दोघांना धडक (Accident) दिली. यानंतर कार अनियंत्रित होऊन शेताच्या बांधावरून पलटी झाली.

दरम्यान कारने धडक दिल्यानंतर अर्चना व तमन्ना यांना उचलले असता तमन्ना हि गंभीर जखमी झाली होती. तर अर्चना हीचा पाय मोडला होता. तसेच कार पलटी झाल्याने कारचालक देखील जखमी झाला होता. दोन्ही बहिणींसह चालकाला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तमन्ना हिचा मृत्यू झाला होता. तर अर्चनावर सध्या उपचार सुरु आहे. याप्रकरणी लोण बु. येथील अनिल खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ भरत ईशी हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

SCROLL FOR NEXT