Amalner Accident News
Amalner Accident News Saam tv
महाराष्ट्र

Amalner Accident News: यात्रेसाठी जाताना काळाचा घाला; बहिणीकडे आलेल्‍या तरूणीचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : बहिणीच्या घरी यात्रेसाठी आली. यात्रेत रिक्षातून जात असतांना रिक्षाला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटून झालेल्‍या (Accident) अपघातात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याची घटना १३ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास (Amalner) अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ घडली. आश्विनी गुलाब भामरे असे मयत तरुणीचे नाव आहे. (Breaking Marathi News)

धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी १३ मेस खेडी खुर्द प्र.ज. (ता.अमळनेर) येथे राहत असलेल्‍या तिच्या मोठ्या बहिणीकडे आली होती. रात्री यात्रेत जाण्याचे ठरले. त्यानुसार रात्री साडेआठच्या सुमारास बहिणीची सासू व नणंद या दोघांसोबत अश्वीनी रिक्षाने अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. तर बहिण व मेव्हणे हे दुचाकीवरुन मार्गस्थ झाले. दरम्यान मेहेरगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक या वाहनाने रिक्षाला कट मारला. यामुळे रिक्षा रस्त्यालगत उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनीच्‍या डोक्याला गंभीर दुखापत होवून तिचा जागीच मृत्यू झाला. तर रेखाबाई पाटील व वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले.

अश्‍वीनीचे नुकताच जमले होते लग्‍न

अपघातानंतर तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात अश्विनीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मयत अश्विनी हिच्या पश्चात आई– वडील, भाऊ असा परिवार आहे. अश्विनीचे काही दिवसापूर्वी लग्न जमले होते. मात्र लग्नापूर्वीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी रविवारी दुपारी निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नवी मुंबईत शिवसेना मनसेची नियोजन बैठक संपन्न

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

Aditya Thackeray: खरी शिवसेना एकच, शिवसेना उद्धव ठाकरे; भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT