Jalgaon Innova Car Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली, तरुणीचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

Jalgaon Innova Car Accident News : जळगाव जिल्ह्यातील नशिराबादजवळ मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर इनोवा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नशिराबादजवळ इनोवा कारचा भीषण अपघात

  • अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू

  • चालक गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  • अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

  • पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील नशिराबाद जवळ मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद जवळ मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास इनोवा कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावर कारचे नियंत्रण सुटल्याने इनोवा कार डिव्हायडरला धडकली. या धडकेत कार मधील तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सदर अपघात जळगाव कडून भुसावळकडे जाताना हा झाला आहे. या अपघातातील जखमी तरुण कार चालकाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही तासानंतर सुरळीत करण्यात आली. दरम्यान भीषण अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Saree Designs: लग्नासाठी साड्यांच्या या हटके 5 डिझाईन्स, नवरीचा लूक पाहून सर्वच करतील कौतुक

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरला

Varsha Usgaonkar: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ४७ लाखांचा गंडा! नेमकं काय आहे प्रकरण?

Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ३००० रुपयांनी स्वस्त; १ तोळा सोन्याचा भाव किती?

Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबतचं नातं तुटलं, राखीनं थेट स्विमिंग पूलमध्ये मारली उडी; घरातील सदस्य हैराण | VIDEO

SCROLL FOR NEXT