Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूने गाठले; अपघातात तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : दोन्ही मित्र ११ नोव्हेंबरला रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान मोटरसायकलने दुचाकीवरून भुसावळकडून जळगावकडे जात होते

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव- भुसावळ महामार्गावरील रस्त्यावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यु झाला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच या तरुणाचा मृत्यूने गाठले आहे. तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तालुक्यातील कोरपावली परिसरात घडली आहे. 

तालुक्यातील कोरपवली येथील राहुल संतोष सोनवणे (वय २१) व दिपक उर्फ देवेन्द्र दत्तु तायडे (वय २३) हे दोन्ही मित्र ११ नोव्हेंबरला रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान मोटरसायकलने दुचाकीवरून भुसावळकडून (Jalgaon) जळगावकडे जात होते. यावेळी महामार्गावरील गोदावरी हॉस्पीटलजवळ असलेल्या एका ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील (Accident) दोघेजण दिल्याने रस्त्यावर फेकले गेले. यात दोघेजण गंभीर जखमी झाले होते. 

दरम्यान या भीषण अपघातात राहुल सोनवणे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला दीपक हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच कोरपावली गाव व परिसरात सर्वत्र एकच शोककळा पसरली आहे. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT