Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : घरापासून काही अंतरावर गेले अन् काळाचा घाला; अपघातात पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Jalgaon News : बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास बांधकामावर पाणी भरण्यासाठी सुनील राणे हे पत्नी अनिता यांना दुचाकीने घेऊन घरून निघाले होते.

Rajesh Sonwane

जळगाव : नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने त्या भागात पहाटेच नळाला पाणी येणार होते. यामुळे पाणी भरण्यासाठी पती- पत्नी औद्योगिक वसाहत मधील घरापासून दुचाकीने मार्गस्थ झाले. परंतु घरापासून काही अंतरावर पोहचताच दाम्पत्याच्या दुचाकीला वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे. 

अनिता सुनील राणे असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. (Jalgaon) जुन्या औद्योगिक वसाहत परिसरातील सदगुरु नगरात राहणारे अनिता व पती सुनील राणे यांचे रिंगरोड येथे घराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास बांधकामावर पाणी भरण्यासाठी सुनील राणे हे पत्नी अनिता यांना दुचाकीने घेऊन घरून निघाले होते. अजिंठा चौकातून दुचाकीने जात असताना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार (Accident) धडक दिली. या धडकेत अनिता राणे यांचे डोके थेट धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर पती सुनील राणे यांनाही मार लागला.


वर्दळ नसल्याने मदतीला कोणीच नाही 
पहाटेची वेळ असल्याने महामार्गावर फारशी वर्दळ नव्हती. यामुळे अपघात झाल्यानंतर बराच वेळ मदत मिळू शकली नाही. मात्र अजिठा चौकातील रिक्षास्टॉपवर एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे दिसल्याने त्याने तत्काळ एमआयडीसी पोलिसांना फोन करून घटना कळविली. ड्यूटीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीसह मृत महिलेला उचलून जिल्‍हा रुग्णालयात हलविले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT