Bhadgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhadgaon Accident : पुलाचा कठडा तोडून दुचाकी कोसळली खाली; दोघा मित्रांचा मृत्यू

Jalgaon News : २७ मे रोजी दोघेही भडगाव तालुक्यातील दुसऱ्या गावात लग्न सोहळ्यासाठी जात होते. दरम्यान नालबंदी गावाजवळील छोट्या पुलावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात घडला

Rajesh Sonwane

जळगाव : जवळच्या गावात असलेले लग्न कार्यासाठी जात असताना काळाने घाला घातला. यात रस्त्यावर असलेल्या पुलावर दुचाकी अनियंत्रित होऊन कठडा तोडून थेट पुलाच्या खाली कोसळली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. 

भडगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर हा अपघात घडला. संतोष भिल (वय ३५) व गोकुळ रमेश सोनवणे (वय ३५) असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. दोघेही सावदे (ता. भडगाव) येथे वास्तव्यास होते. मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान २७ मे रोजी दोघेही भडगाव तालुक्यातील दुसऱ्या गावात लग्न सोहळ्यासाठी जात होते. दरम्यान नालबंदी गावाजवळील छोट्या पुलावर त्यांच्या दुचाकीचा भीषण (Accident) अपघात घडला. 

दुचाकी पुलाचे कठडे तोडून खाली गेल्याने दोघेही पुलाच्या खाली पडले. यात संतोष भिल याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गोकुळ सोनवणे हा गंभीर जखमी झाला होता. (Jalgaon) जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT