Sambhajinagar Crime : ट्रक चालकाला लुटणारे ५ जण ताब्यात; १५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव चौफुली परिसरात असणाऱ्या एस क्लबजवळ हा ट्रक आला. यावेळी कारमधून आलेल्या अनोळखी ४ ते ५ जणांच्या टोळक्याने ट्रकच्या पुढे गाडी उभी करत अडविले
Sambhajinagar Crime
Sambhajinagar CrimeSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव चौफुली शिवारात एक ट्रक चालकाला लुटण्यात आले होते. पोलिसांनी या लूटमार करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १३ लाख रुपये किमतीचा एक ट्रक आणि २ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या खतांच्या बॅग असा एकूण १५ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. 

Sambhajinagar Crime
Pimpalner News : पिंपळनेर बंदला प्रतिसाद; महिलेवरील अत्याचार घटनेच्या निषेधार्ध आदिवासी संघटनेचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील तिसगाव चौफुली परिसरात असणाऱ्या एस क्लबजवळ हा ट्रक आला. यावेळी कारमधून आलेल्या अनोळखी ४ ते ५ जणांच्या टोळक्याने ट्रकच्या पुढे गाडी उभी करत अडविले. यानंतर ट्रक चालकाला शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करत तेथून पोबारा केला. सदर घटनेबाबत ट्रक चालकाने पोलिसात (Police) तक्रार दिली होती.  

Sambhajinagar Crime
Nashik News : शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू; अंघोळीसाठी गेले असताना घडली घटना

दरम्यान वाळूज पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून लूटमार करणाऱ्या ५ संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ताब्यात घेतलेल्या संशयितांची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. तसेच त्यांच्याकडून एक ट्रक आणि खतांच्या बॅगा मिळून सुमारे १५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com