Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : कंपनीतील काम आटोपून दुपारी साडेतीनच्या सुमारास दत्तू पाटील दुचाकीने घरी फुलपाट येथे जाण्यासाठी निघाला.

Rajesh Sonwane

जळगाव : कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ ५ जुलैला घडला होता. 

धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील फुलपाट येथील दत्तू प्रकाश पाटील (वय ३४) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्तू पाटील हा आई- वडिल, पत्नी, भाऊ आणि दोन मुलांसह फुलपाट गावात वास्तव्याला होता. टाकरखेडा येथील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून तो काम पाहत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी कंपनीतील काम आटोपून दुपारी साडेतीनच्या सुमारास दत्तू पाटील दुचाकीने घरी फुलपाट येथे जाण्यासाठी निघाला. याच दरम्यान पाळधी गावाजवळ आला असता सुसाट (Accident) वेगाने आलेल्या डंपरने त्याला दुचाकीसह उडविले. 

डंपरने दिलेल्या धडकेत दत्तू हा गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ८ जुलैला रात्री अकराला त्याचा (Death) मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबाने एकच आक्रोश केला. मंगळवारी (ता. ९) सकाळी दहाला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पाळधी औटपोस्टला अपघाताची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

Shilpa Shetty: 'परी म्हणू की सुंदरा...' शिल्पा शेट्टीचा स्टायलिश अंदाज

Sindhudurg : विवाहितेची आत्महत्या, पतीसह माजी नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार; ठाकरे गटाचे नेते पोलीस स्टेशनवर धडकले

Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

SCROLL FOR NEXT