Jalgaon Police Accident News Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon Police News: पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळलं, आषाढी एकादशीच्या दिवशीच पोलीस अधिकाऱ्यासह चालकाचा दुर्देवी अंत

Jalgaon Police Accident News: एकीकडे आषाढी एकादशीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

Jalgaon Police Accident News: एकीकडे आषाढी एकादशीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे पोलिसांच्या शासकीय वाहनावर रस्त्यावरील झाड कोसळलं.

या दुर्घटनेत सहायक पोलीस निरीक्षक (Police) निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला. तर तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. ही दुर्देवी घटना गुरुवारी (२९ जून) रात्री ९ वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ घटना घडली.

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2023) दिवशीच दोन पोलिसांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी अशी मृत पोलिसांची नावे आहेत.

या वृत्ताला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर काही पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन गुरूवारी रात्री पिलखोड (Jalgaon News) येथे एका गुन्ह्याच्या तपासाठी निघाले होते.

यादरम्यान प्रवासात रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ चालत्या वाहनावर अचानक रस्त्यावर मोठा वृक्ष कोसळला. यात सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे जागीच ठार झाले.

तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तिघे गंभीर जखमी झाले.दरम्यान, घटनेची माहिती मिळाताच कासोद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना वाहनाच्या बाहेर काढण्यात आले. सर्वांना एरंडोल येथील रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

मात्र, उपचाराआधीच गंभीर जखमी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अपघाताच्या या दुर्दैवी घटनेने जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT