Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : हनुमान दर्शनावरून परताना मोटारसायकलला अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

Jalgaon News : जळगाव शहरातील कंजरवाडा येथील नेहाल राजेश माछरे (वय १८) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. काम करून नेहाला हा शिक्षण घेत होता.

Rajesh Sonwane

जळगाव :  शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन परत येत असताना  मन्यारखेडा फाट्याजवळ झालेल्या अपघातात (Jalgaon) जळगावातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

जळगाव शहरातील कंजरवाडा येथील नेहाल राजेश माछरे (वय १८) असे अपघातात (Accident) मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. काम करून नेहाला हा शिक्षण घेत होता. त्याचे वडील राजेश माछरे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान त्याचा भाऊ अक्षय राजेश माछरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आते बहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघेजण सोमवारी (२२ जानेवारी) बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते.

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळी दर्शन घेतल्यानंतर माघारी परतत असताना मन्यारखेडा फाटाजवळ पुढील तरुणांच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात मोठा आक्रोश केला. नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT