Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: काही अंतरावरच घर असताना काळाचा घाला; भरधाव कार अंगावरून गेल्‍याने मृत्‍यू

काही अंतरावरच घर असताना काळाचा घाला; भरधाव कार अंगावरून गेल्‍याने मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गिरणा नदी पुलाजवळ असलेल्‍या जकात नाक्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून अपघात (Accident News) झाला. या धडकेत दुचाकीस्वार महामार्गावर फेकला गेला. याचवेळी आलेली कार अंगावरून गेल्‍याने त्याचा (Jalgaon News) जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. (Letest Marathi News)

बांभोरी येथील दिपक सुरेश नन्नवरे (वय २०) हा आई– वडील आणि भावांसोबत वास्तव्यास होता. मोलमजूरी करुन कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्‍यान मंगळवारी (७ फेब्रुवारी) सांयकाळी दिपक नन्नवरे हा मित्र ललित गोकूळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत जळगावकडून बांभोरीला दुचाकीने जात होता. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरून राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

महामार्गावर मधोमध पडल्‍याने घात

दुचाकीच्‍या समोरासमोर झालेल्‍या धडकेत दिपक हा महामार्गावर मध्यभागी पडला. त्याचवेळी बांभोरीकडून जळगावकडे जाणारी भरधाव कार दिपकच्‍या अंगावरून गेली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला ललित पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर बांभोरी गावातील ग्रामस्थांनी व मित्र परिवारने घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या ललितला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुलांसाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT