Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: सायकलस्‍वारास बसची धडक; शेतमजूराचा मृत्‍यू

सायकलस्‍वारास बसची धडक; शेतमजूराचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

वरणगाव (जळगाव) : नवनिर्मित द्रुगती महामार्गवर तळवेल गावाजवळील आयुध निर्माणी फाट्यावर (Muktainagar) मुक्ताईनगरकडून येणाऱ्या खाजगी बसने सायकलस्‍वारास जोरदार धडक (Accident) दिली. यात सायकलस्वार मजूराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार रात्री घडली. (Varangaon) वरणगाव पोलिसात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

भिमनगर आयुध निर्माणी परीसरातील शेतमजूर सुकलाल शेनफडू वाघ (वय ६५) हा तळवेल येथून शेतमजूरी करून सायंकाळी सातच्या सुमारास सायकलने घराकडे जात होता. या दरम्‍यान वरणगाव आयुध निर्माणी फाट्याजवळून द्रुगती महामार्ग सायकलने ओलंडत असतांना मुक्ताईनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या खाजगी आरामदायी बसने सुकलाल वाघ यास जबर धडक दिली. अशी फिर्याद दिनेश मदन बाहरे यांनी दिली आहे.

सुकलाल वाघ यांना पोलिसांच्या व तळवेल गावातील नागरीकांच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषीत केले. त्यांचे ग्रामिण रुग्णालयातच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyasabha Election: तावडे, आवठवलेंसह भाजपच्या उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं जळगाव कनेक्शन

Arjun Tendulkar Wedding : शुभमंगल सावधान! सचिनच्या लेकाचं झालं लग्न, अर्जुन-सानियानं घेतले सातफेरे, पाहा व्हिडिओ

Sakhee Gokhale: मोकळे केस अन् घायाळ करणारं सौंदर्य

Hair Dandruff Oil: केसांतील कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी बनवा तेल

SCROLL FOR NEXT